जिल्हा कारागृह भंडारा येथे दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता दरम्यान पोलीस हवालदार बांते हे कर्तव्यावर हजर असताना जिल्हा कारागृह भंडारा वर्ग क्रमांक 1 मधील बंदिवान कैद्यांकरिता नातेवाईकांना फोन लावण्याकरिता ॲलन कार्ड लावण्यात आलेले होते. त्यावेळी स्थानबद्ध बंदिवान कैदी सम्यत दाभणे वय 24 वर्षे रा. राणा प्रताप नगर नागपूर हा त्या ठिकाणी मला फोन लावायचा आहे तू बाजूला हो असे न्याय बंदिवान कैदी दिनेश अग्रवाल याला बोलल्यामुळे त्या दोघांमध्ये शिवीगाळ होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.