लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील अद्यापही काही थकबाकीदार आपला मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने कर संकलन व कर आकारणी विभागाणे वसुलीची धडक मोहीम राबवित आहे. तसेच मालमत्ताकराची व पाणी पट्टी कराची थकबाकी मोठया प्रमाणात वसूल होणे बाकी असल्याने सदरील प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालात मध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.