धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील धुळे शहर व शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे गाव येथील गोवर्गीय जनावरांमध्ये लंम्पी रोगाचा रोगप्रादुर्भाव झाला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील अन्य ठिकाणी होवू नये म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संसर्ग क्षेत्रापासून तीन किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र व 10 किलोमीटर परिघ निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करीत असल्याचे आदेश 3 सप्टेंबर बुधवारी सायंकाळी सहा वाजून 51 मिनिटांच्या दरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा आ