सातारा जिल्ह्यातील वाई,पाचगणी व महाबळेश्वर येथील पर्यटनवाढीच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या सुरूर ते कुंभरोशी या मार्गाची मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पहाणी करून उर्वरित काम गतीने करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. मुंबई - पुणे येथून पाचगणी,महाबळेश्वर व वाई परिसराला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येतात. त्यांच्या सुविधेसाठी व दळण-वळण वेगाने होण्यासाठी महत्वाचा ठरणारा हॅम -2 योजने अंतर्गत सुरू आहे.