अंबड भागातील मुसळे चाळ, वावरे नगर येथे घरफोडी करून चोरट्यांनी 3 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंभा भिमाबाई रोहिदास मुसळे राहणार वावरे नगर, विठ्ठल नगर, मुसळे चाळ, अंबड लिंक रोड यांच्या उघड्या दरवाज्यातून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून बेडरुम मधील लाकडी शोकेसची काच फोडून त्यातील सोन्याची पोत, सोन्याचा नेकलेस, सोन्याचे पट्टी पोट व रोकड असा मुद्देमाल चोरी करून नेला.