दिग्रस-आर्णी बायपास रोडवर दि. २५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. दिग्रसकडून देऊरवाडाच्या दिशेने जात असलेल्या दुचाकी क्र. एमएच-२९ सीएच-३२४८ ला आर्णीकडून दिग्रसकडे येणाऱ्या भरधाव टिप्पर क्र. एमएच-२९ टी-१६०५ ने जोरदार धडक दिली. या अपघातात विनोद पांडुरंग बेरे (२८) व सार्थक विनोद बेरे (५) हे बापलेक गंभीर जखमी झाले. ते दिग्रस येथे दवाखान्यातून उपचार करून घराकडे जात असताना ही दुर्घटना घडली.