तुमच्यातील प्रत्येक जण चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उंचावणारा आहे. खेळाडूंना आवश्यक संधी व संसाधन उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मैदानावरचा प्रत्येक घामाचा थेंबच भविष्यातील यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त आज दि २९ आगस्ट ला १२ वाजता राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या २०० गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.