शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या दरम्यान शेतमजूर महिला रेखा रमेश मते ही आपल्या मुली समवेत कंझरा येथे येत असताना कमळगंगा नदीला अचानक आलेल्या पुरात मायलेकी वाहून गेल्या होत्या सुदैवाने मुलीने काटेरी झुडपाला पकडल्याने थोडक्यात बचावली होती मात्र रेखा रमेश मते यांना शोधण्यासाठी वीर भगतसिंग आपत्कालीन पथकाने शोध कार्य सुरू केले होते रविवार ३१ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या दरम्यान महिलेचा मृतदेह सापडला माहिती मिळतात आमदार हरीष पिंपळे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह काढण्यासाठी सहकार्य केले.