औंढा नागनाथ तालुक्यातील उखळी ते चिंचोली मार्गावर उखळी जवळ अज्ञात भरधाव दुचाकी चालकाने मारोती तुकाराम गायकवाड वय ८० वर्षे यांना पाठीमागून धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान घडली होती. याप्रकरणी मारोती तुकाराम गायकवाड यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकी चालकावर दिनांक २९ ऑगस्ट शुक्रवार रोजी रात्री अकरा वाजे दरम्यान गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोनि राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार टाक करत आहेत.