औंढा नागनाथ ते जिंतूर जाणाऱ्या मार्गावर धार फाटा येथे भरधाव दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी डिव्हायडरला धडकली यानंतर चालकासह एक जण गाडीवरून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 11 सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान घडली. रवी पिराजी नरवाडे वय 45 वर्ष जनार्दन साळवे वय 55 वर्ष राहणार मरडगा तालुका हदगाव जिल्हा नांदेड असे गंभीर जखमी झालेल्या दोघांचे नाव आहे ते दुचाकी क्रमांक एमएच २६ एव्ही ९१६२ या दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगर येथून गावाकडे निघाले होते.