१९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी दिक्षाभूमीवर दिक्षा समारंभाला आले तेव्हा चंद्रपूर येथील सर्कीट हाऊसला मुक्कामी थांबले होते. त्यामुळे सर्कीट हाऊसला एक ऐतिहासीक महत्व प्राप्त झाले. तेव्हा चंद्रपूर येथील वीवीआयपी सर्कीट हाऊसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक बनवा अशी मागणी दिक्षा भुमि बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज दि ९ सप्टेंबर ला १ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून केली आहे.