ओबीसी समाजाच्या हक्काच्या लढ्यात काहीही झाले तरी मी मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका समता परिषदेचे नेते तथा ओबीसी समाजाचे जेष्ठ नेते सुभाष राऊत यांनी व्यक्त केली. बीड येथील झालेल्या जाळपोळीच्या घटनेत मला देखील फटका बसला, परंतु मी भुजबळ साहेबांचा खरा कार्यकर्ता आहे, लढा मागे हटून देणार नाही, असे ते म्हणाले. राऊत पुढे म्हणाले की, “ज्या आमदारांच्या घरांची जाळपोळ झाली, ते आमदार आज सत्ताधाऱ्यांचे पाय चाटण्यासाठी गेले. अशा लोकांमुळेच समाजाची फसवणूक होत आहे. अशी खंतही राऊत यांनी व्यक्त केली.