गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील प्राचीन शनी मंदिर पाण्याखाली गेले आहे. नाथसागर अर्थात जायकवाडी धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने वाढला. यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे तब्बल 18 दरवाजे उघडले. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानंतर गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.