उजळाईवाडी येथे चारचाकी गाडीचे पुढील एक्सेल तुटल्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीत जाऊन आदळली.सुदैवाने या घटनेत चालक सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.ही घटना उजळाईवाडी येथील मुख्य रस्त्यावर आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की MH 04JB 6868 ही चारचाकी संबंधित वाहन कोल्हापूरकडून बेळगावच्या दिशेने जात असताना अचानक पुढील चाकाचे एक्सेल तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.