दुई या गावात चारुदत्त चंद्रकांत जावळे हे राहतात. त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर त्यांची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ सी. एल.२८३७ ही लावली होती. तेव्हा घराबाहेर लावलेली त्यांची ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी मोटरसायकलचा त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.