कराड शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने तीन चोरट्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले असून त्यांच्याकडून चोरीतील पाच दुचाकींसह तीन लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघेही चोरटे कराड शहरातील आहेत. कराड शहर पोलीस ठाण्यातून गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी शहर पोलिसांना वाढते गुन्हे रोखण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.