ऊसतोडणीची १ लाख रुपये उचल घेऊन दिशाभूल केल्या प्रकरणी सावरगाव येथील पती-पत्नीविरुद्ध चारठाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊसतोडणीसाठी कारखान्यावर येतो म्हणून १ लाख रुपये उचल घेऊन बंधपत्र लिहून घेतले. परंतु, कामावर न येता बंधपत्रातील अटींचे पालन न केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चारठाणा येथील उद्धव तुळशीराम करसकर यांनी सोमवार १५ एप्रिलला फिर्याद दिली आहे.