धाराशिव शहरातील जय मल्हार तरुण मंडळ देवकते गल्ली यांनी डॉल्बी, डीजेला बगल देत लोप पावत चाललेली पारंपारिक पोतराज कला सादर करत मंडळातील सदस्यांनी मरीआई लक्ष्मी आणि पोतराजाची वेशभूषा करून आपल्या लाडक्या बाप्पांची दि.६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता मिरवणूक काढली.या मंडळातील कलाकारांनी पारंपारिक पोतराज नृत्य करून सर्व गणेश भक्तांची मने जिंकली.