इचलकरंजी शहरातील महत्त्वाची विश्रांती व व्यायाम स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगतसिंग बागेची पाहणी आमदार राहुल आवाडे यांनी आज सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता केली.या पाहणीत त्यांनी बागेच्या विविध समस्यांची माहिती घेतली व सुधारणा करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले.पाहणीनंतर आमदार आवाडे यांनी बागेमधील कचऱ्याची नियमित साफसफाई करण्याचे आदेश दिले.तसेच,बागेत पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी योग्य ती व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी,असेही सांगितले.