महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांतील उभ्या ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मात्र,या नुकसानाची दखल घेत गाव पातळीवर पंचनामे करण्याऐवजी कृषी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असून,उभ्या ऊस पिकांचे पंचनामे न करण्याची अडमुठी भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.याच पार्श्वभूमीवर आज गुरुवार, दि 11 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता ‘अंकुश’ संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी खराब झालेला ऊस ट्रॉलीने घेऊन शिरोळ तहसीलदार कार्यालयात धडक दिली.