मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्या संदर्भात मनोज जरांगे यांचे मुंबई येथे आमरण उपोषण सुरू आहे परंतु अद्याप सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्याने व मराठा आरक्षणासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके सर्कलमधील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने दिनांक २ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून औंढा ते हिंगोली मार्गावर येहळेगाव सोळंके येथे रस्ता रोको करण्यात येणार आहे या संदर्भात पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले