अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात काही भागात शेत पिके व रस्त्यांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी आज रविवार 31 ऑगस्ट रोजी दुपारी पुयनी-पालम रस्त्याला भेट दिली. पुयनी येथील पर्यायी वळण रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्यामुळे वाहतूक बंद झालेली आहे. या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दुरुस्ती करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी पुयनी व पालम शिवारातील शेत पिकांच्या नुकसानीचीही पाहणी केली.