पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी यांना अनेक रेतीची चोरटी वाहतूक व विक्री करणारे चालक व मालक य लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने ९ सप्टेंबर २०२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की काही इसम मौजे कामळज, येळी, शंकरीर्थ शिवारातील गोदावरी नदीचे पात्रातून बोट व इंजिनच्या सहायाने रेतीचा उपसा करून साठवणूक करून रेतीचा अवैध चोरटी वाहतूक करीत आहेत. या माहितीवरून सायंकाळी १७:५० वाजता छापा कारवाई केली आहे.