बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेशासाठी हैदराबाद गॅझेट जीआर लागू करून एसटी कोट्यातून बंजारा समाजास आरक्षण द्यावे यासह अन्य विविध मागण्यांसाठी जिंतूर येथे मागील 7 दिवसांपासून विनोद आडे यांचे आमरण उपोषण सुरू आहे , या उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्याने बंजारा समाज बांधवांच्या वतीने जिंतूर शहरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळाजवळ जिंतूर - परभणी महामार्ग आणि जिंतूर - जालना महामार्गावर आज बुधवार 10 सप्टेंबर रोजी 4 तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.