वरोरा तालुक्यातील येरखेडा, आबमक्ता, पारडी, साखरा, लोदीखेडा, वडगाव खेमजई या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी वरोरा येथे ये-जा करतात. काल दि 12 सप्टेंबर ला रात्री 8 वाजता ढगफुटी सदृश पावसामुळे नाल्याला मोठा पूर आला आणि शेगाव - टेमूर्डा मार्गावरील आसाळा आणि भटाळा या गावांदरम्यान असलेला नाला ओसंडून वाहू लागला. त्यामुळे सायंकाळी गावाकडे परतणारी मानवविकास मिशनची बस नाल्यावरून जाण्यास असमर्थ ठरली आणि सुमारे ६० ते ७० विद्यार्थ्यांसह थांबली.चार तासांहून अधिक वेळ बस अडकून पडली.