हेरवाड येथील माध्यमिक शाळेच्या नामांतराच्या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. सोमवारच्या ग्रामसभेत,त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित करत नामांतराचा लावलेला फलक तात्काळ काढण्याची मागणी केली.अन्यथा तीव्र आंदोलन सुरू करण्याचा इशाराही दिला.यामुळे सभेत मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता.अखेर समितीने नामांतराचा फलक काढून टाकला आणि संस्थाचालकांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.