आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दत्तापूर मंगरूळ दस्तगीर पोलिस व तळेगाव दशासर ठाणेदार गिरीश ताथोड, गौतम इंगळे, किरण औटे यांच्या मार्गदर्शनात रविवारी रूट मार्च काढण्यात आला. दत्तापूर पोलीस स्टेशन पोलिस अधिकारी व दंगा नियंत्रण पथक यांनी शहरातील मुख्य रस्त्यांवरून शिस्तबद्ध पद्धतीने रूट मार्च करत नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिला. त्याचप्रमाणे मंगरूळ दस्तगीर येथे सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने रूट मार्च शहरातून वेगवेगळ्या मुख्य ठिकाणावरून काढले.