बांधकाम कामगार प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी चक्क बकऱ्या चारणाऱ्या इसमाच्या नावाने इंजिनिअरचा बनावट शिक्का तयार करून फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन दुकानदारास दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता दिग्रस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शासनाने सुरू केलेल्या बांधकाम कामगार योजनेत लाभ घेण्यासाठी ९० दिवसांचे ठेकेदाराकडे काम केलेले दाखले आवश्यक असतात. यासाठी दिग्रस तहसिल कार्यालयाजवळील सामतदादा ऑनलाइन वर्क दुकानाचा मालक निखिल चव्हाण याने बकरी चारणाऱ्या अशिक्षित फिर्यादी राजेश चव्हान नावाने सिक्का बनवला.