स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यास अनुसरुन दरवर्षी प्रमाणे स्वच्छता ही सेवा (SHS) मोहिम दि. 17 सप्टेंबर 2025 ते दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ग्रामपंचायतींनी प्रभावी पणे राबवावी. असे आवाहन आज दिनांक 12 सप्टेंबरला 12 वाजता जिल्हा परिषद चंद्रपुरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी केले आहे.