कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या वाहत्या नदीपात्रात लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.कोल्हापूर महापालिका प्रशासनाने पंचगंगा घाट परिसरात लावलेले सगळे बॅरिगेट हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले. यावेळी पोलीस महापालिका प्रशासनाचे अधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.