नाशिकरोड पिंपळे सदन,गोसावी वाडी येथे अवैधरित्या सुरू असलेली हातभट्टी नाशिकरोड पोलिसांनी उध्वस्त करून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.दोघांवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिकरोड भागातील गोसावी वाडी,पिंपळे सदन येथे स्वतःच्या फायद्यासाठी अवैध रीतीने हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली.ना.रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून महेश रघुनाथ पिंपळे व अरुणा चेतन पिंपळे या दोघांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.