लाडक्या बाप्पाच्या स्वागताला देशभरात उत्साह वाढला असून आज लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी लगबग सुरू आहे. कुंभार वाडे रात्रभर जागून मूर्तीवर अखेरचा हात फिरवत आहे.प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून तयार होणाऱ्या गणेश मूर्तींवर केंद्र सरकारने घातलेली बंदी ९ जून रोजी हटवण्यात आली असली, तरी या बंदीमुळे राज्यातील हजारो मूर्तीकारांचे नियोजन कोलमडले आहे. परिणामी,यंदाच्या गणेशोत्सवासाठी मूर्ती निर्माण आणि वितरणाचे मोठे आव्हान मूर्तीकारांसमोर उभं राहिलं आहे.