आज ५ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने पर्यावरणपूरक आणि स्वच्छ गणेश विसर्जनाची दिशा ठेवत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी शहरातील नागरिकांना विसर्जनासाठी नदी, तलाव याठिकाणी न जाता सुलभ आणि सुरक्षित अशी २३ ठिकाणी आर्टीफिशीयल टँकची व्यवस्था करण्यात आली आहे.महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या पुढाकाराने साकारलेल्या या उपक्रमामुळे नदी-तलावांचे प्रदूषण टाळण्यास मदत होणार असून स्वच्छतेचे भान राखण्याचा संदेश..