गाडेगाव येथील आसना नदीला गणेश विसर्जनाला गेलेल्या दोन भाविकावर काळाने घाला घातला. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन जण वाहून गेले तर एक जनाला गावकऱ्यांनी वाचवले आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान गाडेगाव येथील आसना नदीवर ही घटना घडली. बालाजी कैलास उबाळे आणि योगेश गोविंद उबाळे अस वाहून गेलेल्या 2 तरुणाचं नाव आहे. तर शैलेश इरबाजी उबाळे या तरुणाला गावकऱ्यांनी वाचवले.. घटनेची मिळताच sdrf, स्थानिक पोलीस आणी महसूल विभाग तात्काळ घटनास्थळी पोहचली.