अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील वस्तूंवर ५० टक्के कर लादला आहे. यामुळे देशावर आर्थिक बोजा वाढत आहे आणि देश संकटात येणार आहे. त्यासाठी विदेशी कंपन्यांवर बहिष्कार टाकण्यासाठी अमेरिकन कंपनी ‘मॅकडोनाल्ड’च्या निषेधार्थ आज कोल्हापुरात जुना पुणे - बेंगलोर महामार्गावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. तसंच यावेळी स्वदेशी वापरण्याचा आवाहनही करण्यात आले.