हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माले फाटा चौकात दोन गटांमध्ये वाद होऊन गोंधळ झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास सुरू आहे.प्राथमिक माहितीनुसार, माले फाटा चौकाजवळ काही कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला.या वादाचे रूपांतर आरडाओरडा व मारहाणीत झाले.यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,सार्वजनिक शांततेला बाधा पोहचली.