इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाने आज गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजता यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली असून त्यामुळे निवडणूक प्रक्रियेचा अधिकृत शुभारंभ झाल्याचे चित्र आहे.जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यानुसार,इचलकरंजी महापालिकेमध्ये एकूण 16 प्रभागांची रचना करण्यात आली आहे.यामध्ये 15 प्रभाग हे प्रत्येकी चार सदस्यांचे असतील,तर एक प्रभाग पाच सदस्यांचा असेल.