धोम धरण पाणीबचाव संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे सातारा सिंचन विभागाकडून धोम डावा आणि उजवा दोन्ही कालव्यांचे हेड टू टेल या दरम्यान तेरा ठिकाणी स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. कालवे निर्मितीपासून पहिल्यांदाच एकाचवेळी दोन्ही कालव्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्याची पहिलीच वेळ आहे. कालवे स्वच्छतेमुळे आवर्तन सुरू असताना कोठेही कालवा फुटीची अथवा गळतीची घटना घडणार नाही. संघर्ष समितीचे अध्यक्ष सी.आर. तथा चंद्रकांत रावसाहेब बर्गे व कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी माहिती दिली.