मोरासह लांडोरीची शिकार केल्याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. कराड तालुक्यातील तुळसण-ओंड रस्त्यालगत वनविभागाने ही धडक कारवाई केली. या कारवाईत मृत मोर, लांडोर, छर्रा बंदूक दुचाकी जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता दिली. कोळे, कासारशिरंबे व म्हासोली येथील वनरक्षक रविवारी रात्रगस्त घालत होते. गस्तीवर असताना तुळसण ते ओंड रस्त्यालगतच्या शेतामध्ये अंधारात छर्रा बंदुकीचा आवाज आला.