कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातून परत मुंबईला नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाकडून २०५ बसेस मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून रत्नागिरी जिल्ह्याकडे रवाना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यासाठी २० चालक कम वाहक देखील पाठविण्यात आले आहेत. सातारा विभागीय कार्यालयातून सकाळी ११ वाजता मिळालेल्या माहितीनुसार सातारा विभागातून एकूण २०५ बसेस रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, लांजा, राजापूर आणि मंडणगड आगारात पोहोचणार आहेत.