लातूर -लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर काम करणारे सुमारे ९५० अधिकारी व कर्मचारी यांनी दि. १९ ऑगस्ट २०२५ पासून आपल्या विविध मागण्यांकरिता संविधानिक मार्गाने बेमुदत आंदोलन पुकारलेले आहे. या आंदोलानास राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी जिल्हा परिषदेच्या आवारातील आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या पक्षाचा सदर आंदोलनास जाहीर पाठींबा असल्याचे नमूद केले.