शिंभोरा येथील उर्ध्व वर्धा धरणाचे तीन दरवाजे आज दिनांक 28 ऑगस्ट ला दुपारी एक वाजता उघडण्यात येणार असल्याने, नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान व जलाशयात येणाऱ्या परिगणनानुसार प्रकल्पाच्या धरण परिचालन सूचीनुसार आज दिनांक 28 ऑगस्ट ला दुपारी एक वाजता तीन वक्रद्वार दहा सेंटिमीटरने उघडण्यात येणार आहे. नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे