आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या दरम्यान नायगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट पासून मुंबई येथे आंदोलन करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नांदेड हून हजारो मराठा बांधव मुंबईला रवाना झाले आहेत. न्यायालयाने किती परवानगी नाकारावी, आम्हाला याची चिंता नाही, आरक्षण घेतल्या शिवाय मुंबई हून परतणार नाही असा निर्धार नायगाव येथील मराठा आंदोलकांनी घेतला.