औंढा नागनाथ ते हिंगोली जाणाऱ्या मार्गावर देवाळा फाटा येथे भरधाव स्कार्पिओ जीपचा भीषण अपघात होऊन यामध्ये शिरड शहापूर येथील आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना 11 सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती त्यानंतर जखमींना तात्काळ औंढा नागनाथ,हिंगोली,नांदेड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले यानंतर गंभीर जखमी असलेले शशांक सचिन गाडे युवकाला नांदेड येथे 11 सप्टेंबर च्या रात्री दहा वाजता मृत्यू झाला माहिती दिनांक 12 सप्टेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी चार वाजता औंढा नागनाथ पोलिसांनी दिली.