ओबीसी प्रवर्गात इतर जातीची होत असलेली घुसखोरी थांबविण्यात यावी तसेच राज्यात ५८ लाख कुणबी मराठा नोंदी गैरकायदेशीर असून या नोंदी रद्द करण्यात याव्यात तसेच न्या.संदीप शिंदे समिती रद्द करावी यासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने औंढा तहसील कार्यालय येथे प्रभारी तहसीलदार प्रवीण ऋषी यांना दिनांक २ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आता व भविष्यात देऊ नये यासाठी ५ सप्टेंबरला येळी फाटा रास्ता रोको ठेवण्यात आला आहे