चिखलदरा तालुक्यातील कुलंगणा येथील रहिवासी प्रवीण सुक्राम बेलसरे (१७) यांचा मंगळवारी वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.या हृदयद्रावक घटनेनंतर अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या वतीने आज दुपारी २ वाजता पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले.दरम्यान प्रवीण बेलसरे यांच्या कुटुंबास ५ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.तसेच नरभक्षक वाघाच्या तात्काळ बंदोबस्तासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी वनविभागाला दिले.