पाचोरा तालुका नेहमीच सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोखा आणि एकात्मतेसाठी ओळखला जातो. या परंपरेला अधोरेखित करत आगामी गणेशोत्सव तसेच ईद-दुर्गोत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्यासाठी पाचोरा शहर व तालुक्यातील शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी भवनामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी भूषवले होते.