हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची ( मूग, उडीद, सोयाबीन व तुर) खरेदी करण्यात येणार आहे. आधारभूत दराने खरेदी करण्याकरिता ई-पीक पाहणी असलेला ७/१२ उतारा आवश्यक आहे. तसेच सदर खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणाली द्वारे पार पाडली जाणार आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या पिकांची ई-पीक पाहण