पहिल्या दिवशी गौरी आवाहन दुसऱ्या दिवशी गौरी पूजन व त्याच रात्री माहेरवाशीण विविध खेळ खेळून गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरी करत असतात. आणि तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केले जाते. या सणाला महाराष्ट्रात आजही मोठे महत्त्व असून अनेक जण आपल्या प्रार्थना इच्छा अपेक्षा गौराईंकडे करत असतात. आज अमरावती शहरांमध्ये देखील गौरींचे आगमन मोठ्या उत्साहात झाले असून आज गौरी पूजनाचा दिवशी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी १ सप्टेंबर सोमवार रोजी रात्री साडे सात वाजता गौराईंची पूजा केली आहे...