परप्रांतीय ट्रक चालकांना मारहाण करून जबरी लूट करणाऱ्या टोळीचा नाशिकरोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका रीक्षेतून आलेल्या पाच जणांनी सिन्नर फाट्याजवळ ट्रक चालकाला रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली,तसेच त्यांच्याकडील रोकड जबरदस्तीने काढून घेतल्याचा कॉल नाशिकरोड पोलिसांना आल्यावर गस्तीवर असलेले बीट मार्शल टीमने तेथे धाव घेतली.कोमल सुरेश आढाव व निकिता विलास आव्हाड यांना ताब्यात घेतले असून इतर तिघे फरार झाले आहेत.